पारंपरिक वाद्यांचा कडकडाट, आकाशात भिरभिरणारे मंडळांच्या नावाचे फलक, विविधरंगी प्रकाशझोतांचा लखलखाट अशा भरगच्च माहौलाला फाटा देत आज कोल्हापूरकरांनी विघ्नहर्त्या गणरायाला निरोप दिला. महाव्दार रोड या मिरवणुकीच्या मुख्य मार्गावर यंदा कुठल्याही प्रकारचा झगगमाट, लखलखाट आणि दणदणाट अनुभवायला मिळाला नाही. परंपरेप्रमाणे सायंकाळी सात वाजता अंबाबाई मंदिराच्या गरूड मंडपातील श्री महालक्ष्मी भक्त मंडळाचा मानाचा गणपती विसर्जनासाठी बाहेर पडला. 'बाप्पा मोरया' चा गजर करीत महाव्दार चौकातून कपीलतीर्थ मार्केट मार्गे प्रतिकात्मक काही पावले चालून महालक्ष्मी धर्मशाळेसमोरील कुंडाजवळ मुर्ती आल्यानंतर आरती होवून या मुर्तीचे विधीवत विसर्जन झाले.
बातमीदार - मतीन शेख
व्हिडीओ - मोहन मेस्त्री